रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (18:50 IST)

पूजा खेडकरचे आई वडील गायब, पोलीस शोधात गुंतले

सध्या राज्यात ट्रेनी आयएएस पूजा खेडकर कुटुंबाशी संबंधित वाद वाढत आहे. पीडित शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर पुणे पोलीस तिच्या आईवडिलांचा शोध घेत आहे. पूजाचे आई वडील दिलीप खेडकर व आई मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना पिस्तुलने धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

पूजाच्या आई-वडिलांच्या विरोधात तक्रारी नंतर तिच्या आईवडिलांचे फोन बंद असल्याची माहिती मिळाली आहे. ते तपासात सहकार्य न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्या बाणेरच्या घरात कोणी नसून त्याचा व्हिडीओ पोलिसांनी घेतला आहे. अखेर पूजाचे आईवडील कुठे गेले याचा शोध पोलीस लावत आहे.  

त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची शोध मोहीम सुरु असून पथके तयार करण्यात येत आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. असे पोलिसांनी सांगितले.
त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची चोकशी करून कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. 
 
काय आहे प्रकरण
शस्त्रात कायद्या प्रकरणी वादात सापडलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला मनोरमा खेडेकरांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली असून त्यात त्याचा पोलीस परवाना का काढून घेऊ नये असे विचारले होते. 

मनोरमा खेडरकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन  केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली असून 10 दिवसांत त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. 

त्यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या बाणेरच्या बंगल्यात गेले असता त्यांना तिथे कुलूप दिसले. पोलीस त्यांच्या घरावर नोटीस चिटकवली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit