आयएएस पूजा खेडकरची कार पुणे वाहतूक पोलिसांकडून जप्त
पुणे वाहतूक पोलिसांनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरलेल्या गाडीला सीज केले आहे. खेडकर कुटुंबीयांनी गाडी संबंधित दस्तऐवज अद्याप दिले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर या ऑडी कार मधून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना त्यांची कार पुणे वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. खेडकर कुटुंबीयांनी वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन गाडीच्या चाब्या दिल्या असून अद्याप गाडीची कागदपत्रे दिली नाही.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर या जिल्हाधिकारी म्हणून कायभर सांभाळतात असून त्यांनी ऑडी कारचा वापर केला. या गाडी वर महाराष्ट्र शासन लिहिले असून परिवीक्षा कालावधीत लाल आणि निळे दिवे वाहनावर लावत अधिकारी महाराष्ट्र सरकार कसे लिहू शकतो यावरून वाद निर्माण झाला. नंतर पुणे वाहतूक पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली.
पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी आणि त्यानंतर सेवेत निवडीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी एक सदस्यीय समिती स्थापन केली.
2023 बॅचचे आयएएस अधिकारी सध्या त्यांच्या होम कॅडर महाराष्ट्रात तैनात आहेत. त्यांची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली झाली आहे. सत्तेचा गैरवापर झाल्याच्या तक्रारीमुळे राज्य सरकार ने त्यांची बदली केली आहे. त्यांची नियुक्ती वाशीम जिल्ह्यात अतिरिक्त सहाय्यक अधिकारी म्हणून झाली आहे.
Edited by - Priya Dixit