आयएएस पूजा खेडकरच्या आईला पुणे पोलिसांची नोटीस
सध्या आयएएस पूजा खेडकर आणि तिचे कुटुंब चर्चेत आहे. पूजा खेडकर गैरकृत्यामुळे वादात सापडली आहे. आता पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
पूजा खेडकर या शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. पुणे पोलिसांनी आर्म्स एक्ट प्रकरणात नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये पिस्तूलचे लायसेन्स का काढून घेऊ नये अशी विचारणा करण्यात आली आहे.
पुणे पोलीस मनोरमा खेडकर यांना 10 दिवसांत नोटीसचे उत्तर मागवले आहे. उत्तर न दिल्यास पिस्तुलाचा परवाना रद्द कऱण्यात येईल. या नोटिसात आयपीसीच्या अनेक कलमांचा उल्लेख केला असून एफआयआर मध्ये लावण्यात आल्या आहेत.
या शिवाय पिडीतेकडून मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली आहे. पिस्तुलाचा गैर वापर केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईंना 10 दिवसांत नोटीसचे उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करत पिस्तुलाचा परवाना रद्द कऱण्यात येईल.
एका व्हायरल व्हिडीओ मध्ये पूजा खेडकरच्या आईच्या हातात पिस्तूल असून ती पिस्तूल फिरवताना दिसत असून पिस्तुलाचा गैरवापर करत काही लोकांना धमकवत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून त्यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.
Edited by - Priya Dixit