लॉकडाऊन काळात विजेचा वापर 50 टक्क्यांनी घटला

electricity
Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (08:02 IST)
पुणे शहरात 2018-19 मध्ये व्यावसायिक विजेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट (मिलियन युनिट) इतका झाला होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर 2019–20 या वर्षात 743.56 दशलक्ष युनिट (मिलियन युनिट) इतका झाला. या काळात विजेची मागणी तब्बल 50 टक्क्यांनी घटली आहे. याच कालावधीत सौरऊर्जेचा वापर दुपटीने वाढल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

पालिकेचा 2020-21 चा पर्यावरण अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. पुण्यात विजेचा सर्वाधिक वापर हा घरगुती वापरासाठी होत असून, त्या खालोखाल व्यवसाय, उद्योग, महापालिकेचे प्रकल्प, शेती यासाठी होत आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले होते. पण याच काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात घटला होता.
विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात बसून होते. बहुतांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले होते. तरीही वीजेचा वापर सुमारे 150 दशलक्ष युनिटने कमी झाला आहे. महापालिकेने गेल्या सहा वर्षांतील शहरातील एकूण वीज वापराची माहिती सादर केली. त्यात 2014-15 मध्ये 4 हजार 435 दशलक्ष युनिट, 2015-16 मध्ये 4 हजार 628 दशलक्ष युनिट, 2016-17 मध्ये 4 हजार 501 दशलक्ष युनिट, 2017-18 मध्ये 5 हजार 444 दशलक्ष युनिट 2018-19 मध्ये 5 हजार 601 दशलक्ष युनिटचा वापर करण्यात आला होता. तर2019-20 मध्ये 4 हजार 452 दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.
2015-16 पेक्षाही 2019-20 मध्ये वीजेचा वापर कमी झाला
लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी झाला असला तरी याचकाळात शहरात सौरऊर्जेचा वापर वाढला आहे. 2018-19 मध्ये 2 हजार 667सौरऊर्जा वापरणारे नागरिक होते. त्यांच्याकडून 1.53 कोटी युनिटची वीजनिर्मिती झाली होती. तर 2019-20मध्ये ही सौरऊर्जा वापरणाऱ्यांची संख्या वाढून 3 हजार 211 झाली,.या माध्यमातून 3 कोटी 2 लाख 90 हजार 387 युनिटची वीजनिर्मिती झाली आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

IPL 2022: शेवटच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला ...

IPL 2022: शेवटच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला धक्का, कर्णधार विल्यमसनने सोडला संघ
IPL 2022 मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या विजयासह ...

Rajiv Gandhi Assassination Case : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा ...

Rajiv Gandhi Assassination Case : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राजीव गांधी हत्येतील दोषी ए जी पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय दिला. ...

KKR vs LSG IPL 2022 : प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी ...

KKR vs LSG IPL 2022 : प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकणे आवश्यक
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 66 व्या सामन्यात, जेव्हा ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील फेसबुक ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असते. यावेळी केतकीनं आता ...

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक ...

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक लागून मृत्यू
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला ने जोरदार धडक दिल्याची ...