शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (08:39 IST)

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरु

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी राज्यातील ११ जिल्ह्यांतील निर्बंधात शिथिलता मिळणार असल्याची माहिती दिली होती. परंतू पुणे जिल्ह्याला सध्या तिसऱ्या टप्प्यात टाकले आहे. पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच निर्णय जाहीर करतील.
 
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला, यावेळी गृहमंत्र्यांनी म्हटलंय की, राज्यात जे निर्बंध लागू आहेत त्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील ११ जिल्हे सध्या लेव्हल ३ मध्ये असून यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं असून पुण्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा सुरु आहे. एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.