शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (15:50 IST)

घरकुलमधील घरांची विक्री,भाड्याने दिल्यास फौजदारी कारवाई, महापालिकेचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे योजना राबविणेत येत असलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 10 वर्षापर्यंत सदनिका भाड्याने देणे,विक्री करणे अथवा नातेवाईकास, मित्रास,परीचितास पोटभाड्याने देणे अथवा दान,तारण ठेवता येत नाही.अशा प्रकारचा करारनामा लाभार्थ्यांबरोबर झाला असून त्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदनिकेचा लाभ रद्द केला जाईल. भरलेली रक्कम जमा करून त्याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याने पालिका अशा लाभार्थींवर कारवाई करणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र.17,19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुल प्रकल्पातील 139 इमारतींचे वाटप करण्यात आले. त्यामधील 5838 लाभार्थींना सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. या 5838 लाभार्थींबरोबर झालेल्या करारनाम्यातील अट क्रमांक 10 व महापालिकेने केले अटी-शर्तीनुसार सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून पुढील 10 वर्षापर्यंत ती सदनिका ति-हाईतास किंवा कोणत्याही नातेवाईकास,परिचितास विकत किंवा पोट भाड्याने देता येणार नाही.
 
तसेच सदरील सदनिकेवर पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण,सहकारी – सोसायटीच्या पूर्वसंमतीशिवाय गहाण,दान किंवा तारण इत्यादी बोजा उत्पन्न करता येणार नाही.घरकुल योजनेतीन लाभार्थीने  योजनेअंतर्गत मिळालेली सदनिका कोणत्याही व्यक्तीला भाड्याने,भाडेकरारनाम्याने दिल्याचे अथवा विकल्याचे निदर्शनास आल्यास सदनिकेचा ताबा रद्द करणेत येईल.तसेच त्यांचेवर महापालिकेची फसवणूक केल्याबाबत फौजदारी कारवाई केली जाईल.भरलेली सर्व रक्कम जम करणेत येईल अशी तरतूद आहे.