बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (09:32 IST)

प्रकाश आमटे यांना कॅन्सरवरील उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

prakash amte
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज देण्यात आलंय. प्रकृतीमध्ये सुधार असल्याने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
डॉ. प्रकाश आमटेंना डिस्चार्ज मिळताच कुटुंबीय व लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
शुक्रवारी रात्री ते नागपूरला पोहचणार असून काही दिवस ते येथेच विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पालाकडे जाणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कर्करोग असल्याचे निदान झाल्यापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
 
गेल्या 45 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतारही झाले होते. पण या दीड महिन्याच्या काळात पाच किमोथेरेपी देऊन उपचार सुरु होते.