सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 29 एप्रिल 2024 (11:55 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची आज पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी हे आज लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावर पुणे, बारामती, शिरूर,व मावळ चार लोकसभा निवडणूक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहे.  
पंतप्रधान कराड येथून सभा संपवून संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास हेलीकॉप्टरने रेसकोर्स मैदानावर सभेसाठी दाखल होणार.या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. 

या जाहीर सभेसाठी सुमारे 2 लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून 35 हजार लोकांना विशेष आमंत्रण दिले आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहने, बस साठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
Edited By- Priya Dixit