गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (09:27 IST)

पुणे अपघात प्रकरण : कितीही श्रीमंताचा पोरगा असला तरी सर्वांना समान न्याय होणार अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit panwar
कल्याणी नगर भागात वेगवान कार ने दोन अभियंत्यांना उडवलं. अपघाताच्या वेळी कार एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत चालवत होता.हा अल्पवयीन मुलगा पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून कारवाई टाळाटाळ करण्याचे आरोप करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन या प्रकरणाचा आढावा घेतला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ते म्हणाले, कितीही श्रीमंतांचा मुलगा असला तरी सर्व सामन्याला समान न्याय मिळणार. आरोपीवर कायद्यानुसार कारवाई होणार. 

काल पुण्यात अजित पवार एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि ते म्हणाले, शहरातील अवैध असलेल्या पबवर कारवाई केली जात आहे. चुकीच्या गोष्टींचा मी नेहमीच विरोध करतो. नियमांचे उल्लन्घन करणाऱ्यावर कडक कारवाई होणार. कितीही श्रीमंतांचा पोरगा असला तरीही त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार.  

Edited by - Priya Dixit