रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (10:02 IST)

Pune Crime : 6 गोळ्या झाडून लुटले दागिने

पुण्यात बुधवारी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत आता हल्लेखोरांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाळत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.
 
पुणे शहरातील गुन्हेगारीचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला.