बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:05 IST)

शिक्षकांकडून विद्यार्थ्याला मारहाण पुण्याची घटना

beaten
पुण्यातील जुन्नर तालुक्यात आळेफाटा येथे एका शिक्षकांनी गैरसमज झाल्यामुळे विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील ज्ञान मंदिर ज्युनिअर कॉलेज मध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर शेरोशायरी केल्यामुळे झालेल्या गैसमजमुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथाबुक्यांने मारहाण केली. शिक्षकाने विद्यार्थ्याला केस ओढून लाथाबुक्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ एका विद्यार्थ्याने बनवून सोशल मीडियावर टाकला.हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहे. आणि या शिक्षकाच्या विरोधात अमानुषपणे विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत आहे. 

या व्हिडीओ मध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचे काहीही ऐकून न घेता त्याला मारहाण करत आहे. माझी काहीही चूक नाही माझे ऐकून घ्या हा विद्यार्थी वारंवार म्हणत असून देखील काहीही सत्य न जाणून घेता शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात शालेय प्रशासनाने बैठक बोलावली असून पालकांकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit