शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (08:38 IST)

पुणेकर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

water tap
जल केंद्रांमधील विद्युत व स्थापत्य विषयीच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
 
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जल केंद्र, नवीन व जुने होळकर जल केंद्र, भामा आसखेड जल केंद्र परिसर, वारजे जल केंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, एसएनडीटी (एमएलआर) परिसर, एसएनडीटी (एचएलआर) परिसर व चतुःशृंगी टाकी परिसर, वडगाव जल केंद्र परिसर तसेच कोंढवे धावडे जल केंद्र येथील विद्युत / पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने या परिसरातील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor