मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (09:02 IST)

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात १ जून ते ३१ जुलै यादरम्यान ५३८.५ मीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात ५ टक्के अधिक पाऊस बसरला आहे. राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलै अखेरपर्यंत ७ टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्ह्यांच्या यादीत आता पुण्याचाही समावेश झाला आहे. पुण्यात सरासरीच्या तुलनेत १ टक्के पाऊस कमी पडला आहे. यातच पुण्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे.
 
राज्यात मागील काही दिवासांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे, जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरसरीच्या तुलनेत मागे पडला आहे. मध्य ममहाराष्ट्रातील सातऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे.
 
मुंबई परिसर, कोकणातील काही भाग, मराठवाडा, महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ थांबली असून शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.