सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (09:11 IST)

पुणे हादरले! 85 वर्षाच्या महिलेवर तरुणाकडून बलात्कार, तरुणाला अटक

arrest
पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराच्या समोर फिरणाऱ्या 85 वर्षाच्या एका वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजेची आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्या  फ्लॅटच्या समोर फिरत असताना आरोपी सोसायटी मध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी आलेला होता.

आरोपी पाचव्या मजल्यावर आल्यावर त्याने महिला एकटी असल्याचे पहिले आणि महिलेचे तोंड दाबून तिला जिन्यावरून फरफट नेऊन इमारतीच्या सहाव्या -सातव्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. तसेच महिलेला मारहाण केली. या वेळी पीडित महिलाने प्रतिकार करत आरडाओरड केली. नंतर आरोपी तिथून पसार झाला. 

महिलेने घरी आल्यावर मुलीला सर्व सांगितल्यावर कुटुंबीयांनी तातडीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरु केले. 

पोलिसांनी सोसायटी मध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपी चार दिवसांपूर्वी सोसायटीत इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी आला असल्याचे आढळले. 

आरोपीला अटक करण्याच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत आढळला.त्याने हे काम दारूच्या नशेत केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
Edited By - Priya Dixit