गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (13:03 IST)

राजगुरुनगरमध्ये एका 4 वर्षीय चिमुकल्यावर 24 वर्षीय तरुणाकडून अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक

पुण्यातील राजगुरूनगर येथे एका चार वर्षाच्या मुलावर एका 24 वर्षीय तरुणाकडून अनसैर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाचा हा चिमुकला घरा बाहेर खेळत असताना आरोपीने त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या घटनेमुळे राजगुरूनगर येथे खळबळ उडाली आहे. 
 
घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्यावर संतापाची लाट उसळली. विजय ताठोड असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर बाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केलं असून त्याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

काही महिन्यांपूर्वी बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आरोपीला अटक केली असून खटला सुरु आहे. आता पुण्यातील राजगुरूनगर येथे चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. 
Edited By - Priya Dixit