शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (20:41 IST)

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

murder
पुण्यातील कर्वेनगर भागात मध्यरात्री एकाच्या घरात घुसून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला.राहुल पंढरीनाथ निवगुणे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. ते एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. 
 
कर्वे नगरच्या श्रीमान सोसायटीत राहणारे राहुल पंढरीनाथ निवगुणे हे आपल्या पत्नी आणि तीन मुलींसह वास्तव्यास होते. मध्यरात्री एक वाजता घरातील दार वाजलं त्यांनी दार उघडल्यावर बुरखा घातलेल्या एका इसमाने घरात बळजबरी प्रवेश करून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन तो पसार झाला.वार केल्यावर राहुल यांनी आरडाओरड केला पत्नी आणि तिन्ही मुली आवाजाच्या दिशेने धावत गेल्यावर त्यांना राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

पत्नी आणि मुली त्यांच्या मृत्यूने हादरल्या आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. 
Edited By - Priya Dixit