सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (09:26 IST)

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

narendra modi
पुणे जिल्ह्यातील 56 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन आज दुपारी 12:30 वाजता पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून होणार.अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवे यांनी दिली. 

महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नवीन योजना सुरु केली असून या योजनेमुळे महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना परीक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार. 
 
महाराष्ट्रात एकूण1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार असून वर्धा येथेया कौशल्य केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार असून  या कार्यक्रमास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता  मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार आहेत.
 
पुण्यातील 56  महाविद्यालयात या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन होणार आहे. 
या कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक आणि युवती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ  आणि मान्यवरांनी जवळच्या महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन समारोहासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. 
Edited By - Priya Dixit