शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (15:14 IST)

पुण्यात भरधाव ऑटोरिक्षा चालवणाऱ्या विदेशी महिला पर्यटकाने बाईक स्वारांना उडवले ,एकाचा मृत्यू

पुण्यात हिट अँड रनचे एक प्रकरण समोर आले आहे. ऑटो रिक्षा चालवणाऱ्या विदेशी महिला पर्यटकाने दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला.तर एक गंभीर जखमी झाला.

पुणे येथे एका विदेशी महिला पर्यटकाने जुन्नर शहरात नारायणगाव -ओझर रोडवर भरधाव वेगाने रिक्षा चालवत एका दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करत जोरदार धडक दिली. या दुचाकीवर दोघे बसलेले होते. धडक एवढी जोरदार होती की या अपघातात बाळासाहेब डेरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र संजय जाधव गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा विदेशी महिला पर्यटक चालवत असून तिचे मित्र प्रवास करत होते.त्यांनी धडक दिल्यावर ते पसार झाले आणि नाशिक जिल्ह्याच्या दिशेने निघाले. वाहनाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात संशयितांना रोखले आणि चौकशीसाठी नारायणगाव पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit