शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (17:37 IST)

पुण्यात 7 भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, लचके तोडले

पुण्यातील चाकणजवळील कडाचीवाडीत 7 भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केलाआणि त्याचे लचके तोडायला सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ समोर आला आहे. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

हा चिमुकला आपल्या घराच्या समोर रस्त्यावर खेळत असताना काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याचे लचके तोडायला सुरु केले. मुलाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय बाहेर आले आणि कुत्र्यांना पळवले. तो पर्यंत कुत्र्यांनी मुलाचे लचके तोडले होते. कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले नंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. 

सीसीटीव्हीत कैद झालेली ही भीषण घटना सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. 
Edited by - Priya Dixit