मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (14:47 IST)

पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाने पाच वाहनांना धडक दिली,महिलेचा मृत्यू

apghat
पुण्यात पौडरोड परिसरात रविवारी रात्री एका मद्यधुंद चालकाने टेम्पो चालवत पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.चालकाला भारतीय न्यायिक संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली अटक केली आहे.

आरोपी वाहन चालकाने मद्यधुंद अवस्थेत चार पाच वाहनांना धडक दिली वाहन चालकाने बेदारकारपणे  वाहन चालवले अशी माहिती पोलिसांनी दिली. आशिष पवार असे या वाहन चालकाचे नाव आहे. 

कोथरूडच्या करिष्मा सोसायटीच्या बाजूने टेम्पो चालक भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला असता त्याने चार ते पाच वाहनांना जोरात धडक दिली.

या अपघातात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर वाहन चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी आरोपी आशिष पवार याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे.  
Edited by - Priya Dixit