मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 25 ऑगस्ट 2024 (15:38 IST)

खडकीत भीषण अपघातात एकाचा मृत्यू,6 गंभीर जखमी

पुण्याच्या खडकी भागात कार आणि एसटी बसची धडक होऊन भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. 

बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसची कारला धडक बसली त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात बस आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटने नंतर परिसरात खळबळ उडाली. 

सदर घटना पुण्यातील खडकी भागात घडली आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास एसटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit