बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (08:28 IST)

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

death
पुण्यात एका 26 वर्षाच्या CA  तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अ‍ॅना सेबॅस्टियन पिरायिल असे या मयत तरुणीचे नाव आहे. मुलीच्या आईने मुलीच्या बॉसवर कामाचा ताण देण्याचा आरोप आहे. 

मयत तरुणी मार्च 2024 मध्ये पुण्यात कामाला लागली होती.नंतर 4 महिन्यांनंतर तिचा मृत्यू झाला. मुलीच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना पत्राद्वारे मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मुलीच्या आईचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर नेटकऱ्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. 

तरुणीच्या आईने लिहिले आहे मी खूप दुखी असून हे पत्र लिहीत आहे. मी माझ्या मुलीला गमावलं आहे. ती नोव्हेंबर 2023 मध्ये सीए झाली आणि 19 मार्च 2024 मध्ये पुण्यातील या कंपनीत तिला काम मिळाले.मात्र तिचा 4 महिन्यातच मृत्यू झाला. 20 जुलै रोजी तिचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे. ती फक्त 26 वर्षाची होती. ती नवीन काम, नवीन वातावरण, कामाचा वाढत ताण असल्यामुळे काळजीतच असायची. तिला तणाव असायचा मारा ती त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. 

ती कंपनीत रुजू झाल्यावर कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी  राजीनामा दिल्यावर तिला टीम मॅनेजरने म्हटले तुला आपल्या टीम विषयीच्या सर्वांच्या भावना बदलायचा आहे. तिच्यावर कामाचा खूप ताण होता. त्यामुळे ती तणावात असायची. अखेर तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील कोणीही आले नव्हते. 

या प्रकरणावर केंद्रीय कामगार मंत्रालयाने मुलीच्या आईची तक्रार स्वीकार केली आहे असे म्हटले आहे. तिच्या मृत्यूची चौकशी केली जाईल असे कामगार राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी सोशल मीडियाच्या X प्लॅटफॉर्मवर लिहिले  अ‍ॅना सेबॅस्टियन पिरायिल या तरुणीच्या मृत्यूच्या बातमीने खूप दुःख झाले. अशा प्रकारच्या असुरक्षित आन तणावपूर्ण वातावरणातील आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तिला न्याय मिळवून देणार या साठी कामगार मंत्रालय आणि मनसुख मांडवीया यांनी तक्रार घेतली आहे.    
Edited By - Priya Dixit