शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (10:44 IST)

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी तब्बल 300 मोबाईल चोरले

अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले.कडेकोट बंदोबस्त असताना देखील  पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरटयांनी तब्बल 300 लोकांचे मोबाईल चोरून नेले. गणेश विसर्जन मिरवणूक 30 तास सुरु होती. मोबाईल चोरीचे प्रकरण खडक, विश्रामबाग, समर्थ पोलीस ठाणे आणि फरासखाना ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 91 मोबाईल चोरी गेले असून फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश व नाशिक येथील मोबाईल चोरीच्या टोळीतील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाखहुन अधिकचे 21 मोबाईल जप्त केले आहे. 
 
गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी कुमठेकर रास्ता, लक्ष्मी रास्ता, कुवळेकर रस्ता, आणि टिळक रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. मिरवणूक बघणाऱ्यांची गर्दी सकाळपासून सुरु असते. गर्दी दुसऱ्यादिवशी विसर्जन झाल्यावर दुपारी सम्पत्ये. 

गर्दीत मोबाईल आणि मौल्यवान वस्तू गहाण होण्याचा प्रकरणावर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आले. तरीही मोबाईल चोरटयांनी मोबाईल चोरून नेले. 
 Edited By - Priya Dixit