संबंधित माहिती
- LIVE: पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी
- Weather News:पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी
- पुण्यात 25 वर्षीय तरुणीची इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
- Historical and cultural करिता ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील या ठिकाणांना नक्की द्या भेट
- सोलापूर-पुणे महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उलटली, २० जणांची प्रकृती गंभीर
पुणे तिहेरी हत्याकांड प्रकरण:लग्नासाठी दबाव आणल्यावर महिलेला तिच्या मुलांसह जिवंत जाळले
Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव परिसरात एका महिलेचे आणि दोन मुलांचे जळालेले मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी आता या हत्येचे गूढ उकलले आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतर लोकांना धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती केशव सोनवणे (वय25, रा. वाघोरा, तालुका माजलगाव) आणि तिची दोन लहान मुले स्वराज (वय 3) आणि विराज (वय 1) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी अखेर हत्येचे गूढ उकलले आणि बीड जिल्ह्यातील आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव गोरख पोपट बोखारे असे आहे,
आरोपी मृताचे नातेवाईक असून मृत महिला आणि तिच्या पतीमधील वाद सोडवण्यासाठी वारंवार घरी यायचे. त्यावर महिलेचे आरोपीशी जवळीक होऊन विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. स्वाती आरोपीवर लग्नासाठी दबाब आणायची
या वरून दोघांमध्ये वाद झाले.
23 मे रोजी आरोपी आळंदीहून शिरूरच्या ताच्या घरी मृत महिला आणि तिच्या दोन मुलांना नेताना त्याने वाटेत एका निर्जन भागात दुचाकी थांबवली आणि महिलेचा गळा आवळून खून केला आणि डोक्यावर दगडाने वार करून तिला ठार केले. नंतर तिच्या मुलांनाही ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पाण्याच्या बाटलीत पेट्रोल आणले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याच्या वेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि गुन्ह्याचे ठिकाण ओसाड असल्याने पोलिसांना पायांचे ठसे मिळवणे कठीण झाले होते. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज उपलब्ध नव्हते.
9 मे रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. शिरूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत ढोले म्हणाले, "आमच्या तपासात असे दिसून आले की ही महिला तिच्या पतीशी झालेल्या भांडणानंतर आळंदी येथील तिच्या वडिलांच्या घरी गेली होती. ती आणि तिची मुले 23 मे रोजी बोखारे यांच्यासोबत आळंदीहून निघाली."लिसांनी संशयावरून बोखारे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती आणि वाघोली ते राहुरीपर्यंत अहिल्यानगर परिसरातील 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. 25 मे रोजी पुणे-अहिल्यानगर रोडवरील रांजणगाव-खंडाळे येथील एका खाजगी कंपनीच्या मागे असलेल्या शेतात एका महिलेचे आणि दोन मुलांचे अर्धे जळालेले मृतदेह आढळले.
आरोपीला शनिवारी सकाळी अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले असून 11 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit
