1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (12:47 IST)

पुणे अनलॉक; मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

pune unlock from 14 June
पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा करत आता मॉल्स आणि दुकांन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. येत्या सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन यात निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी नियमांची माहिती दिली. सोमवारपासून या नियमावलीचं पालन करून मॉल्स सुरू करण्यास तसेच दुकानंही ४ वाजेऐवजी ७ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हे नियम सोमवारपासून लागू होणार असले तरी यापूर्वी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दल स्पष्ट करत अजित पवारांनी म्हटले की पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे लागू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यांनी पुणेकरांना आवाहन केले  की, त्यांनी नियमांचं पालन करावं.