बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (10:48 IST)

पुण्यात भरधाव बाईकनं महिलेला हवेत उडवलं

पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात एक महिला रस्ता ओलांडत असताना समोर भरधाव वेगात येणाऱ्या एका बाईक चालकाने महिलेला हवेत उडवले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली आहे. रंजना प्रकाश वसवे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर परिसरात एक महिला रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. समोर भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने महिलेला हवेत उडवले. गंभीर जखमी झाल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आहे. रंजना प्रकाश वसवे या श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते समीर वसवे यांच्या मातोश्री होत्या.
 
कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या भरधाव वाहन चालविणाऱ्या व सायलेन्सर आणि हॉर्नमधून कर्णकश आवाज काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी संबंधित तरुणांवर कडक करावाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांद्वारे केली जात आहे.