बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (14:48 IST)

Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, चर्चेला उधाण

raj thackeray devendra
मनसे प्रमुख राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले होते.ही बैठक सुमारे एक तास सुरु होती.राज ठाकरे हे त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पुण्यात सभासदाच्या नोंदणी साठी पोहोचले. त्यानंतर आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय आवासस्थळी सागर येथे पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा सुरु होती. चर्चेचे कारण अद्याप कळू शकले नाही. नेत्यांची ही  बैठक सुमारे एक तास सुरु असून दोन्ही नेत्यांनी बैठकी बाबत गुप्तता पाळली असल्यामुळे आता या बैठकीबाबत अनेक तर्क वितर्क लावत चर्चा सुरु आहे.  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली.  गणेशोत्सव येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत. त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सागरवर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. मात्र, तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहेत.
 
राज ठाकरे आज सकाळी 8 वाजता सागर बंगल्यावर आले होते. राज ठाकरे यांनी अचानक ही भेट घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे. गणपती दर्शनाला घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी आल्याचं सांगितलं जातं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याने राज्याची राजकीय परिस्थिती आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.