बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (12:15 IST)

तळजाई टेकडी प्रकल्पा विरोधात राज ठाकरे यांचे पुण्यात आंदोलन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तळजाई टेकडी प्रकल्पा विरोधात येत्या 24 ऑक्टोबरला मोठं आंदोलन करणार आहे. पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. तळजाई टेकडीवरील प्रकल्पामुळे अतिक्रमण केले जाण्याच्या विरोधात हे आंदोलन करत असल्याची माहिती मिळाली आहे.हे आंदोलन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या आंदोलनाला सकाळी 7 वाजे पासून सुरुवात होईल.असं वसंत मोरे यांनी सांगितले.
 
सहकार भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकरच्या जागेवर जैवविविधता वसुंधरेच्या प्रकल्पाचा आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे.नागरिकांचे म्हणणे असे आहे की या प्रकल्पामुळे परिसराची जैव विविधता नष्ट होऊ शकते.त्यासाठी नागरिकांचा विरोध या प्रकल्पासाठी केला जात आहे. या साठी नागरिकांचे 'तळजाई बचाव अभियान 'सुरु झाले आहे.त्याला समर्थन देण्यासाठी मनसेने हे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.  
 
काळ राज ठाकरे यांनी पुण्यात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदार संघाचा आढावा घेतला.आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी काही सूचना दिल्या.राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व शाखा अध्यक्षांना नेमणूक पत्र वाटप केले.पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहर संघटक शहर सचिव आणि विभाग सचिव उपस्थित होते.