बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (21:56 IST)

अ‍ॅड. रुपाली पाटील यांची राज्याच्या महिला उपाध्यक्षपदावर वर्णी

पुणे :  आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Pune MNS) मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील कार्यकरिणीमध्ये मोठे बदल केले आहेत. पुण्यातील मनसे (Pune MNS) महिला शहराध्यक्ष अ‍ॅड.रुपाली पाटील (Adv. Rupali Patil) यांची राज्याच्या महिला उपाध्यपदावर नियुक्ती केली आहे.
 
अ‍ॅड. रुपाली पाटील यांच्या जागेवर माजी नगरसेविका वनिता बागस्कर (Vanita Wagaskar) यांची नियुक्ती केली आहे. येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या ( पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महिला संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने केलेल्या या नेमणुका महत्वाच्या मानण्यात येत आहे.
 
पुणे मनसे महिला कार्यकारिणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे शहर महिला सेनेच्या नवीन कार्यकारणी घोषणा केली यामध्ये प्रामुख्याने वनिता वागस्कर याची पुणे शहर अध्यक्ष पदी व उपशहर अध्यक्षपदी अस्मिता शिंदे (Asmita Shinde), जयश्री पाथरकर (Jayshree Patharkar), पद्मिनी साठे (Padmini Sathe) यांची निवड करण्यात आली आहे.
 
या सर्वांना निवडीची पत्र राज ठाकरे यांनी दिले. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore),राजेंद्र वागस्कर (Rajendra Wagaskar), शहर अध्यक्ष वसंत मोरे (City President Vasant More),राज्य सरचिटणीस, राज्य उपाध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष,
मनसे पुणे शहरातील (Pune MNS) अनेक पदाधिकारी उपस्थित होते.