संबंधित माहिती
- चिनी मोबाइल कंपनी विवोने IPL टायटल प्रायोजकातून माघार घेतले
- भाजपची मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार, शिवसेनेचा मार्ग मोकळा
- काय म्हणता, साफसफाई करतांना सोन्या - चांदीचे दागिने पर्ससह कचऱ्याच्या घंटागाडीत टाकले
- पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल सांगितले म्हणून त्याने तिचे दात पडले
- जेव्हा पत्नी पतीवर थेट चोरीचा आरोप करते
पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार
नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवार उभा करुन भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. मात्र महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, या दृष्टीने भाजपाला मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यासोबत यापुढील काळात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी देत पुणे पदवीधर निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली. त्यानुसार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी माघार घेतली.
