मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (10:45 IST)

Road Accident: पिकअप जीपचा अपघातात 25भाविक जखमी, 2 मृत्युमुखी

अहमदनगर येथून गगनगिरी महाराज खोपोली येथे घेऊन वेगाने जाणाऱ्या पिकअप जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलाच्या कठड्यावर आदळून अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर 25 जण जखमी झाले आहे .हा अपघात मंगळवारी पहाटे 2:30 च्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वलवण पुला जवळ झाला आहे. जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक संदीप ज्ञानदेव भालके आणि दीपक सुभाष कडाळे हे मृत्युमुखी झाले आहे. तर अक्षय कडाळे, अजय  कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय मेंगाळ, रेवण कडाळे, अवधूत मधे ,अर्जुन कडाळे, संतोष पारधी, करणं कडाळे, प्रवीण भगत, विलास कडाळे, विजय कडाळे, लक्ष्मी कडाळे, रेशमा पारधी, ओंकार कडाळे, अमोल दुधवडे आणि 5लहान मुले आणि 5 महिला जखमी झाले आहेत. अपघाताची  माहिती मिळतातच लोणावळा पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहे .