1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)

पुण्याच्या लोहगाव येथील विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; संगणक अभियंता ‘गोत्यात’

Rumors of a bomb being planted on a plane at Lohgaon in Pune; Computer engineer Maharashtra News Pune Marathi News webdunia Marathi
पत्नीला विमानाचे तिकीट अधिकृत करण्यास विमान कंपनीने नकार दिल्याने संतापलेल्या पुण्यातील एका संगणक अभियंत्याने विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा  पसरवली. या अफवेमुळे पुणे विमानतळावर  एकच खळबळ उडाली. पोलीस बॉम्बशोधक पथकांसह अन्य सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाची कसून तपासणी केली, मात्र, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तासांचा विलंब झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. ऋषिकेश सावंत Rishikesh Sawant (वय-28 रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा आयटी कंपनी  नोकरीला आहे. सावंत याच्या पत्नीला रांची  येथे जायचे असल्याने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता तो पत्नीला सोडण्यासाठी लोहगाव विमानतळावर आला होता. 16 ऑक्टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकीट होते. परंतु 16 ऑक्टोबर पासून विमानतळ बंध आहे. त्यामुळे सावंत तेथील कर्मचाऱ्यांना विमानाचे परतीचे तिकीट 16 तारखेला अधिकृत करु द्या, असे सांगत होता. परंतु कर्मचाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रांचीला निघालेल्या विमानात बॉम्ब आहे, असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली. विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलीस सतर्क झाले. पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक , राज्य राखीव बलाच्या तुकड्या,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्या.सावंतने सांगितलेले विमान तात्काळ बाजूला घेण्यात आले. विमानाची तीन तास कसून तपासणी करण्यात आली.त्यावळी सावंतने विमानातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लिल वर्तन केले.दरम्यान ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.