रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (08:52 IST)

पुण्यात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, स्कूल व्हॅन चालकाला अटक

crime
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये दोन 6 वर्षीय विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅनच्या चालकाला अटक केली आहे. तसेच ही घटना 30 सप्टेंबर रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली वानवडी परिसरात असलेल्या शाळेतून घरी परतत होत्या.
 
मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी दोन सहा वर्षांच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्कूल व्हॅनच्या चालकाला अटक केली आहे. एका अधिकारींनी सांगितले की, ही घटना 30 सप्टेंबर रोजी शहरातील वानवडी भागात असलेल्या शाळेतून मुली घरी परतत असताना घडली.
 
वानवडी पोलिस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, आरोपीने व्हॅनमधील मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि एका मुलीने तिच्या आईला या घटनेबद्दल सांगितले, त्यानंतर त्यांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपी चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहे.