शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (09:06 IST)

पुणे-लोणावळा दरम्यान सात तर पुणे-तळेगाव दरम्यान एक लोकल सुरु

लोणावळा सेक्शनमध्ये आतापर्यंत सहा लोकल ट्रेन धावत होत्या. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा मार्गावर एक तर पुणे-तळेगाव मार्गावर एक अशा दोन लोकल ट्रेनची यात भर पडली आहे. या लोकल ट्रेन शुक्रवार (दि. 15) पासून सुरु झाल्या आहेत.
 
नव्याने सुरु झालेली पुणे-तळेगाव दरम्यान लोकल क्रमांक 01586 पुणे स्थानकावरून सकाळी 8.57 वाजता सुटेल. ही लोकल 9.47 वाजता तळेगाव स्थानकावर पोहोचेल, तर तळेगाव-पुणे दरम्यान लोकल क्रमांक 01587 तळेगाव स्थानकावरून सकाळी 9.57 वाजता सुटेल. ही लोकल 10.50 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
 
नव्याने सुरु झालेली दुसरी लोकल ट्रेन पुणे-लोणावळा दरम्यान लोकल क्रमांक 01574 पुणे स्थानकावरून रात्री 7.05 वाजता सुटेल. ही लोकल रात्री 8.30 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा-पुणे दरम्यान लोकल क्रमांक 01573 लोणावळा स्थानकावरून रात्री 8.40 वाजता सुटेल. ही लोकल रात्री 10.00 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
 
15 सप्टेंबर पासून लोकलचे वेळापत्रक –
पुणे – लोणावळा
लोकल क्रमांक (01486) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01482) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01586) पुणे स्थानकावरून 08.57 वाजता सुटेल. तळेगाव स्थानकावर 09.47 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01566) पुणे स्थानकावरून 15.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 16.20 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01488) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01484) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01574) पुणे स्थानकावरून 19.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 20.30 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01494) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.
 
लोणावळा – पुणे
लोकल क्रमांक (01493)  स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01481) लोणावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01587) तळेगाव स्थानकावरुन 09.57 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 10.50 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01485) लोणावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01565) लोणावळा स्थानकावरून 17.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 16.50 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01483) लोणावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01487) लोणावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.
लोकल क्रमांक (01573) लोणावळा स्थानकावरून 20.40 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 22.00 वाजता पोहोचेल.