बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (07:34 IST)

22 वर्षीय तरुणीचा वोर्डबॉयनेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार

पुण्यात ऑपरेशनसाठी ऍडमिट झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा वोर्डबॉयनेच विनयभंग केला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात 5 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील नामांकित रुग्णालयात पीडित तरुणी दाखल झाली होती. तिच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाणार होती. तिला ऑपरेशन रूममध्ये नेल्यानंतर आरोपी वोर्डबॉयने तिच्या गुप्तांगाला हात लावून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.
 
या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.