मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (15:08 IST)

धक्कादायक ! नवोदित अभिनेत्री वर काम देण्याचे आमिष दाखवून बलात्कार

पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही अभिनेत्री हडपसर येथील रहिवासी आहे. आरोपीने विविध चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. विशेष म्हणजे आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची मागणी केली आहे.
या अभिनेत्रीने आरोपीच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी बलात्कार, ब्लॅकमेल आणि खंडणी अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजेश माल्ल्या, अभिजित गणपत साठे आणि त्यांची बहीण अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणीने काही लघुचित्रपटात काम केले असून तिची ओळख आरोपी अभिजित साठे याच्याशी झाली. आरोपी राजेश याची मुंबई मध्ये मेमर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंट नावाची कंपनी असून ही कंपनी चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटचे साहित्य पुरवण्याचे काम करतात. या मुळे त्याची ओळख अनेक दिग्दर्शकांशी आहे. याचा फायदा घेत आरोपीने विविध चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. आणि तिचे काही अशील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणाला दाबण्यासाठी एका महिला वकिलाने जबरदस्तीने नोटरी करून घेतल्याचे आरोप देखील फिर्यादीने केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहे.