सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (19:11 IST)

धक्कादायक !सावित्री फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मारहाण

savitri bai fule collage
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना आज घडली आहे. हाणामारीची घटना विद्यापीठाच्या भोजनगृहाजवळ घडली असून विद्यापीठातील सदस्यांच्या नोंदणीवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर वादाचे हाणामारीत रूपांतरण झाले.

या हाणामारीमुळे विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी पोंहोंचून दोन्ही संघटनांची बाजू ऐकली .हाणामारी झाल्याचा प्रकार विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कळविला पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाऊन घेतले. पुणे विद्यापीठाच्या आवारात अशी घटना घडल्यानी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 
 
Edited by - Priya Dixit