1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Some shocking revelations in the postmortem report of Shnavi

वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे तब्बल 29 व्रण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये भयानक माहिती उघड

मुळशीच्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात, वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे झाले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे, पोलिसांनी सासू, पती आणि नणंद यांना कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती, सासू आणि नणंद यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आता तिघेही २८ मे पर्यंत पोलिस कोठडीत राहतील. तसेच या प्रकरणात पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.  
वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे झाले आहे. न्यायालयात दिलेल्या युक्तिवादात पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तथ्ये नमूद केली. वैष्णवीच्या शरीरावर एकूण २९ जखमा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की वैष्णवीला आत्महत्या करण्यापूर्वी गेल्या २४ तासांत १५ जखमा झाल्या होत्या. ही माहिती पोलिसांनी न्यायालयात स्पष्टपणे मांडली आहे.
 
वैष्णवीच्या शरीरावर झालेल्या जखमांपैकी एक जखम तिच्या मृत्यूच्या ६ दिवस आधी झाली होती, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. वैष्णवीच्या शरीरावर झालेल्या ११ जखमा ५ ते ६ दिवसांपूर्वीच्या आहे. यापैकी २ जखमा ३ ते ६ दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले जाते, हे देखील पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समाविष्ट आहे. या कारणास्तव, पोलिसांनी सखोल चौकशीसाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे.
 
पुढील लेख
विरोधकांना चोख उत्तर देताना अमित शहा म्हणाले मोदींनी देशाला चौथ्या क्रमांकावर आणले