रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:16 IST)

काय म्हणता, पुणेकरांना अवघ्या ५ रुपयात प्रवास करता येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनेआता पुणेकरांना पाच रुपयांत पुण्यातील ३७ मार्गावर प्रवास करता येणार आहे. पीएमपीएमएलच्या वतीने ही योजना अटल प्रवास योजना म्हणून पुणेकरांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमामुळे पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणार आहे.