मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (15:26 IST)

अशी आहे राज ठाकरे यांची भन्नाट ऑफर

पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा.तुमच्या घरी जेवायला येतो,अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे.त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे. 
 
नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे पुण्यात आले. पुणे पालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून त्यांनी शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली.चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल,असं राज यांनी म्हटलं आहे.कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे.सध्या पुण्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.