स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्वारगेट बस स्थानकात शिवशाहीच्या बंद बस मध्ये 25 फेब्रुवारी रोजी आरोपी दत्ता गाडे याने एका 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करून पसार झाला. आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातीलगुनाट गावातून तीन दिवसांनी अटक केली.
पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
आज आरोपीची न्यायालयीन कोठडी संपल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आरोपी दत्ता गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit