ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून पैशाची बॅग हिसकवणाऱ्या आरोपीला अटक,चोरीचे पैसे जप्त
पुण्यातील ग्रामीण भागातून एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून पैशाची बॅग हिसकवणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध काढून अटक केले आहे. अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या कडून 45 लाख रुपये जप्त केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक शरद मधुकर डांगे हे आपल्या कुटुंबियांसह चौफुलाच्या एका हॉटेल मध्ये गेले होते. तिथे बंडू उर्फ गजानन कळवाघे हे होते. बंडू नावाच्या या आरोपीने मधुकर यांच्या हातून पैशांचा बॅग हिसकावला आणि पसार झाला. या बॅगेत 50 लाख रुपये होते.
या घटनेची नोंद त्यांनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरु केला. आरोपीच्या शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. या साठी तांत्रिक पथकाची मदत घेतली.
पोलिसांनी कसून तपास केल्यावर त्यांना बॅग हिसकवणाऱ्या आरोपीचा शोध लागला. आरोपीची माहिती मिळतातच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि आरोपी बंडूला न्हावरा फाटा येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले पैसेही जप्त केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Edited By- Priya Dixit