शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (07:54 IST)

हालाखीची आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला ब्राह्मण संघाने दिला मदतीचा हात

The Brahmin Sangh
कर्जाचा डोंगर घेऊन दोन खोलीच्या घरात हालाखीची आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला ब्राह्मण संघाने मदतीचा हात दिला. महासंघाच्या वतीने ज्येष्ठ दाम्पत्याला रोख पंधरा हजार रक्कम तसेच, पुढील महिने पुरेल एवढं किराणा साहित्य, वैद्यकीय सेवा देण्यात आली.
 
विश्वनाथ सोमण (81) व अपर्णा सोमण (74) असे या दाम्पत्याचे नाव आहे. सिंहगड रोड, नऱ्हे येथील दोन खोलीच्या घरात ते राहत आहेत. एकेकाळी उत्तम परिस्थिती असलेल्या या कुटुंबाची अवस्था सध्या अतिशय बिकट आहे. मुलगा सून यांनी त्यांना बाजूला लोटलं. तरीही हार न मानता हृदयरोग, कर्करोग सारख्या आजारांनी ग्रासले असतानाही त्यांनी घरगुती खाद्य पदार्थाचा व्यवसाय सुरु करुन उदरनिर्वाह चालवला. पण, कोरोनामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन पूर्ण बंद झाले.
 
सोमण यांनी डॉ. गोविंद कुलकर्णी यांना पत्र लिहून मदतीची विनंती केली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमण यांची भेट घेऊन रोख पंधरा हजार रक्कम तसेच, पुढील महिने पुरेल एवढं किराणा साहित्य, वैद्यकीय सेवा देण्यात आली.
 
या उपक्रमाला अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी केतकी कुलकर्णी, सुनील शिरगांवकर, सुयोग नाईक, गिरीश कुलकर्णी, प्रिया काळे, पराग महाशब्दे, सरचिटणीस दीपिका बापट, स्वरस्वती जोशी, शिल्पा महाजनी, मनीष जोशी, हेमंत कासखेडीकर, सुधाकर मोडक, मंदार रेडे यांनी आर्थिक मदत केली. श्रीकांत देशपांडे, विकास अभ्यंकर यांनी किराणा साहित्य दिले. वारजे शाखेच्या उपाध्यक्षा शैला सोमण यांनी सोमण परिवारातर्फे त्यांना मदतीचे आश्वासन दिले, नाना काटे व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुढील तीन महिने जेवण्याच्या डब्याची तयारी दर्शवली.