मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (07:35 IST)

येत्या गुरुवारी पुणे शहरातील 'या' भागाचा पाणी पुरवठा बंद

येत्या गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर आणि नवीन होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.
 
लष्कर जलकेंद्र भाग –लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सावंतवाडी, इत्यादी.
 
नवीन होळकर आणि चिखली पंपींग भाग - विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर, इत्यादी.