मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:39 IST)

वडगाव, कात्रज आणि धनकवडीचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद !

वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पंपिंग विषयक दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव, कात्रज, धनवकडी व परिसरात गुरूवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाकडून कळविण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि.26 फेब्रुवारा) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
 
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक व परिसर.