गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:51 IST)

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग भुयारी होणार !

पुण्यातला खडकवासला-स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोचा मार्ग भुयारी होणार आहे. महापालिका हद्दीतील खडकवासला मतदारसंघाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत नुकतीच बैठक झाली. त्यात आयुक्तांनी ही माहिती दिली असं आमदार भीमराम तापकीर यांनी सांगितलं.तापकीर यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन या प्रकल्पासाठीची कार्यवाही वेगानं करण्याची मागणी केली. हा मार्ग भुयारी करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 
 
तापकीर यांनी सांगितलं की, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व उत्तमनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महापालिकेकडे वर्ग करणे, वारजे ते नवले ब्रिज महामार्गावरील रस्त्यालगतच्या साचलेल्या कचऱ्यामुळं पसरलेली दुर्गंधी, महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या ॲमेनिटी स्पेसच्या जागा पीएमआरडीए कडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणं यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.