1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (11:47 IST)

पुण्यात रस्त्यावर गोल्डमॅन चिन शिंदेचीची गोळ्या झाडून हत्या

Goldman sachin shinde shot dead in Pune
पुणे- शहरात घडलेल्या एका थरारक घटनेत भर रस्त्यावर गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
 
माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेच्याजवळ ही घटना घडली. सचिन शिंदे रस्त्याच्या बाजूला उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात सचिन शिंदेच्या मानेला एक गोळी लागली आणि तो जागेवरच कोसळला. 
 
भर रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. पूर्ववैमनस्यातून सचिन शिंदेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. सचिन शिंदे हा गोल्डमॅन म्हणून ओळखला प्रसिद्ध होता. त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता.