मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (08:49 IST)

पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले

पुण्याजवळील कात्रज घाटातील आडबाजूच्या रस्त्यावर दोन दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या चिमुकल्या बाळाला जीवदान दिले.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास कात्रज घाटातील आडबाजूला एका बाळाला टाकून दिले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर सहाय्यक निरीक्षक मधुरा कोराणे यांनी यांनी घटनास्थळी धाव घेत या बाळाला उचलून घेतले. पुढील उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या बाळाची प्रकृती उत्तम आहे.
 
या चिमुकल्या जीवाला या ठिकाणी कोणी आणून टाकले याचा शोध भारती विद्यापीठ पोलीस घेत आहे. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस यातील आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.