गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (20:56 IST)

पुण्यात ‘या’ तारखेला रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार

maharashtra kesari
भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

66 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुण्यात रंगणार आहे.  7 ते 10  नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विजेत्याला महिंद्रा थार जीप, उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीगीराला ट्रॅक्टर आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.






Edited By - Ratnadeep Ranshoor