सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)

युवकावर गुंडाच्या काही टोळक्याकडून तलवारीने आणि कोयत्याने वार

पुणे शहरातील हडपसर भागात एका युवकावर गुंडाच्या काही टोळक्याने तलवारीने आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तरुणावर झालेल्या या जीवघेण्या  हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. हा हल्ला का करण्यात आला याची नेमकी माहिती अद्याप मिळाली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुणे शहरातील लोकांनी गजबजलेल्या हडपसर परिसरात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणाचं नाव रोहन इंगळे असून त्याच्यावर शहरातील एका गुंडाच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यावेळी रोहण आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका एटीएममध्ये शिरला होता. परंतु या गुंडाच्या टोळक्याने रोहणला एटीएममधून बाहेर ओढून तलवार आणि कोयत्याने वार केले आहेत.
 
यावेळी तिथे उपस्थित असणारा आणखी एका तरुणाने रोहणला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण गुंडाच्या टोळक्यातील एका युवकाने त्यालाही तलवारीचा धाक दाखवला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी घडलं आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.